पंढरपूर मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

येथे एका अल्पवयीन मुलीवर सात दिवस लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पीडितेच्या आईने शहर पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करून या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, भाजपचे विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी या संदर्भात आरोपीवर कठोर कारवाई ची मागणी केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूरमधील डोंबे गल्ली परिसरात राहणाऱ्या एका 16 वर्षांच्या मुलीवर 27 वर्षीय युवकाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबासह या भागात राहते. तिची आई आणि भाऊ मोल मजुरीचे काम करतात. काही महिन्यांपूर्वी पीडित मुलगी आरोपी विकास जाधव (वय 27 ) याच्या संपर्कात आली होती.

मुलीचे वय फिर्याद देताना मुलीने व आई ने 16 वर्ष 11 महिने सांगितले होते, शाळा आणि नगरपालिका मधून दाखले आणले आहेत, त्यानुसार 14 वर्ष 11 महिने वय आहे. त्याप्रमाणे फिर्यादी चा पुरवणी जबाब घेतला आहे. आज न्यायालयात मुलीचा आणि फिर्यादी चा 164 चा जबाब आहे , त्यात मुलीचे वय 14 वर्ष 11 महिने सांगितले आहे. या प्रकरणातील आरोपी अटकेत असून 28 तारखे पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

आरोपी विकास जाधव हा पीडितेशी फोनवर सतत बोलत असयचा. पीडितेच्या आईला संशय आल्यानंतर तिने मुलीला समजावून सांगितले. त्यानंतरही आरोपी पीडितेच्या घरी गेला आणि तिला सोबत घेऊन गेला होता. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.मुलीवर सलग सात दिवस अत्याचार झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. या प्रकरणी पीडिता आणि तिच्या आईने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून IPC 363, 376, पोक्सो 4, 8, 12 प्रमाणेच गुन्हा दाखल आहे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी विकास जाधवला अटक केली आहे. संशयित आरोपी विकास जाधव याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. तर दुसरीकडे, भाजपचे आमदार  गोपिचंद पडळकर यांनीही आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!