ताई , आता माघार घेऊ नका !

महिला मतदारांची अपक्ष उमेदवार शैलाताई गोडसेंना विनंती

इसबावी भागात सौ शैलाताई गोडसे यांचे महिलांनी उत्स्फूर्त स्वागत केले.


पंढरपूर : ईगल आय मीडिया

ताई, तुम्ही आजवर मतदारसंघाच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे, लोक संपर्क, त्यांच्या सुखा दुःखात सहभागी होत आहात, तरीही राजकीय पक्षांनी तुमच्या कार्याचा अवमान केला आहे, तेव्हा आता माघार घेऊ नका, अशी विनंती बहुसंख महिला मतदारांनी अपक्ष उमेदवार शैलाताई गोडसे यांना केल्याचे दिसून आले.

शैलाताई गोडसे आज पंढरपूर शहरातील इसबावी भागांमधील मतदार बंधू भगिनींच्या भेटीगाठी घेत आहेत. ग्रामीण भागातील प्रचार दौरा करीतच आज इसबावी भागातील महिला मतदार या सौ शैलाताई गोडसे यांचे उत्साहाने स्वागत करीत होत्या. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक मध्ये शैलाताई गोडसे यांनी आपला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर शैलाताई गोडसे यांचा झंजावती प्रचार दौरा सुरू झाला आहे.


सौ. शैलाताई गोडसे यांनी आपल्या प्रचार फेरीत मतदारांशी संवाद साधत मतदारांचे मनोगत जाणून घेऊन जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न , इसबावी परिसरांमधील रखडलेली विकास कामे पूर्णत्वास नेण्याचे अभिवचन देऊन “फक्त एक वेळ विधानसभेसाठी संधी द्या” संपूर्ण मतदार संघाचा सर्वांगीण विकास तसेच बेरोजगारांच्या हाताला एमआयडीसीच्या माध्यमातून काम मिळवून देण्याचे व महिला भगिनींना आर्थिक बळ मिळावे. म्हणून लघु उद्योगास चालना देण्याचे आश्वासन शैलाताई गोडसे यांनी दिले.


वाखरी, इसबावी या भागांमधील महिला मतदारांनी प्रचंड उत्साहात सौ.शैलाताई गोडसे यांचे घरोघरी स्वागत केेेले. वयोवृद्ध, ज्येष्ठ वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेत शैलाताई यांनी इसबावी परिसरामध्ये आपला प्रचार दौरा आज सुरू केला. महिलांचा तसेच पुरुष मतदारांचा सौ.शैला ताईच्या उमेदवारीस पाठिंबा मिळत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!