दोन्ही विद्यालयाचा निकाल १०० टक्के
पंढरपूर : ईगल आय न्यूज
कोर्टी ( तालुका पंढरपूर ) येथील शांती निकेतन गुरुकुल परिवारातील प्रोग्रेस इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्याच बरोबर शांतिनिकेतन परिवारातील कोर्टी ( तालुका पंढरपूर ) येथील राहुल गांधी माध्यमिक विद्यालयाचा ही इयत्ता दहावी चा निकाल शंभर टक्के लागला आहे.
प्रोग्रेस इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी अजिंक्य दत्तात्रय कोंडलकर याने ९२.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक पायल शिवाजी बोरावके ९२ टक्के, तृतीय क्रमांक विठ्ठल अजित मेटकरी ९० टक्के, चतुर्थ क्रमांक पार्थ जयसिंग मिसाळ ८९.८० टक्के, पाचवा क्रमांक वीरेंद्र दशरथ यादव ८९.०० टक्के यांनी मिळवला आहे.
शांतिनिकेतन गुरुकुल परिवारातील राहुल गांधी माध्यमिक विद्यालयानेही उज्वल यशाची परंपरा कायम राखल असून दहावी चा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक संयुक्तरित्या वृषाली दत्तात्रय तांबवे व जानवी अमर कांबळे ९३.६० टक्के गुण, द्वितीय क्रमांक श्वेता राजू पवार ९२.४० टक्के गुण, तृतीय क्रमांक विभागून प्रणाली जालिंदर बंडगर व अंकिता गणेश पाटील ९१.८० टक्के, चतुर्थ क्रमांक भिवरा धुळा वाघमोडे ९० टक्के व पाचवा क्रमांक प्रणित रवींद्र नागणे ८९.४० टक्के हे विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री डी यु कोंडलकर सर, सचिव सौ मंगल कोंडलकर, संचालक श्री ए पी जानकर सर, श्री रामेश्वर कोंडलकर सर, मुख्याध्यापिका सौ आर एस पांढरे मॅडम, ज्युनिअर कॉलेज प्राचार्य श्री बी एम शिंदे सर, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री ए एन लवटे सर, इंग्लिश मीडियम चे प्राचार्य श्री एम बी वाघमारे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले