संभाजी भिडे वगैरे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का?

पुण्यात शरद पवारांनी भिडेंची लायकी काढली

टीम : ईगल आय न्यूज

संभाजी भिडे वगैरे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का? काहीही प्रश्न विचारता का ? संभाजी भिडे आणि अमुक – तमुक अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी पुण्यात संभाजी भिडे यांची लायकी काढली. दोन दिवसांपूर्वी भिडे यांनी मराठा आरक्षण विरोधी वक्तव्य केले होते.या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर पवार संतप्त झाले आणि पत्रकार परिषद सोडून गेले.

खा.शरद पवार पुण्यात असताना त्यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने त्यांना संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावर मांडलेल्या भूमिकेवर प्रश्न विचारला. पण प्रश्न पूर्ण व्हायच्या आत शरद पवारांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. भिडे यांच्या सारख्या प्रश्नावर प्रतिक्रिया देणार नसल्याचं नमूद केलं.

काय म्हणाले होते भिडे ? सांगलीत मराठा आरक्षणावर बोलताना संभाजी भिडे यांनी मराठ्यांनी आरक्षण मागू नये, ते सिंह आहेत त्यांनी देशावर राज्य करावे, आरक्षण मागणी करू नये, असा सल्ला मराठा समजाला भिडे यांनी दिला होता.

संभाजी भिडे वगैरे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का?काहीही प्रश्न विचारता का? म्हणूनच मी तुम्हाला भेटायचं नाही मी म्हणत होतो. हल्ली कसेही प्रश्न विचारतात. एकंदर आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक-तमुक…असं म्हणत शरद पवारांनी त्यांची प्रतिक्रिया आवरती घेत थेट पत्रकार परिषद थांबवली.

Leave a Reply

error: Content is protected !!