शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण

प्रकृती स्थिर असल्याची माहिती

टीम : ईगल आय मीडिया

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आगामी काळात ते हळूहळू रिकव्हर होतील. तसेच पुढील काही दिवसांत पवार यांच्या गॉल ब्लॅडरवर सुद्धा शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. काल दुपारी त्यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे

30 मार्च रोजी दुपारी पवारांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी घरी येऊन त्यांची तपासणी केली होती. त्यानंतर पवारांच्या पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. काल (30 मार्च) संध्याकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या.

शरद पवार यांच्या पित्ताशयात खडे तयार झाले होते. पवारांच्या पित्ताशयातील एक खडा नलिकेच्या तोंडाशी अडकून बसला होता. त्याच्यामुळे त्यांच्यावर कालच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टर नी घेतला. आम्ही उद्या शस्त्रक्रिया केली असती तर त्यांच्या स्वादूपिंडाला आणखी सूज आली असती. त्यांच्या तब्येतीवर आणखी परिणाम झाला असता. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सध्या शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!