खा शरद पवारांचा आम. प्रशांत परिचारक यांना सल्ला
पंतांच्या आठवणीत रमले पवार
पंढरपूर : ईगल आय मीडिया
सुधाकरपंत सहकारी संस्था चालवताना अतिशय काटकसरीने कारभार करत होते. ते भेटल्यानंतर सतत शेतकरी, सर्व सामान्य माणूस याविषयी चर्चा करत असत.
त्यांच्या अनेक आठवणी आपल्या सोबत आहेत.
त्यांच्या पश्चात या सर्व संस्था चालवण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर असून त्यांच्यासारखाच कारभार करा अशा शब्दात जेष्ठ नेते खा शरद पवार यांनी आ. प्रशांत परिचारक यांना सल्ला.
यावेळी पंतांचे ज्येष्ठ बंधू प्रभाकर काका परिचारक यांचे सांत्वन केले. माजी आम सुधाकरपंत परिचारक यांचे मागील महिन्यात निधन झाले. मंगळवारी पवारांनी पंढरपूर येथे येऊन परिचारक यांच्या निवासस्थानी जाऊन परिचारक कुटुंबाची भेट घेतली. आणि पंतांच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आम. भारत भालके, उमेश परिचारक, युवक नेते प्रणव परिचारक उपस्थित होते.
यावेळी खा. पवारांनी पंतांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. पंतांच्या पाश्चात्य प्रथमच पवारांचे वाड्यात आगमन झाले. गेल्या 6 ते 8 वर्षात पवार, परिचारक कुटुंबात राजकिय अंतर पडल्यामुळे पंढरीत आल्यानंतर ही पवार आणि पंतांची भेट झाली नाही. यापूर्वी पंत आणि पवारांनी सुमारे 4 दशके मिळून काम केल्याने दोघांचे अतिशय स्नेहाचे, आदराचे नाते निर्माण झाले होते. आज या भेटीमुळे त्यांच्या समर्थकानाही भारावून टाकले. पवारांच्या या भेटीनंतर पंत आणि पवारांच्या असंख्य आठवणी जाग्या झाल्या.