टीम : ईगल आय मीडिया
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाबाई अंकुशराव टोपे यांचे रविवारी पहाटे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
शारदाबाई टोपे या मागील 4 महिन्यापासून आजारी आहेत आणि त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांचे सुपुत्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे राज्यातील कोरोना विषाणू विरोधातील लढाईत आघाडीवर आहेत. त्यातूनही रोज टोपे त्यांच्या मातोश्रीना भेटायला रुग्णालयात जात होते, आईची काळजी वाहून ना टोपे राज्यातील कोरोना युद्धात लढत होते.
आज पहाटे शारदाबाई यांची प्राणज्योत मालवली. त्या 74 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर अंबड येथे शासकीय नियमानुसार मर्यादित लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार होतील असे टोपे यांनी सांगितले असून आज 2 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
ती अजातशत्रू होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही, माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडील गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आशीर्वाद दिले. तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील
– आरोग्य मंत्री राजेश टोपे