शेळवे येथील शेतीचे पंचनामे अजुनही संपेनात


एकटा तलाठी आणि दोन गावचे पंचनामे

पंढरपूर : ईगल आय मीडिया

शेळवे ( ता.पंढरपूर ) येथील शेतीचे पंचनामे अजुनही संपुर्ण झालेले नाहीत. भिमा नदीला आलेल्या महापुरामुळे व कासाळ ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे तसेच अतिवष्टीमुळे शेळवे परिसरातील संपुर्ण शेती ऊद्वस्त झालेली आहे.

शेळवे येथील भिमा नदीचा महापुर ओसरुन आठ ते दहा दिवस झालेले आहेत. त्यानंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार,खासदारांनी या गावाला भेट दिली तरीही, शेळवे येथील शेतीचे पंचनामे करण्यासाठी एकही अधिकारी फिरकलेला नाही. शेळवे व खेडभाळवणी गावचे तलाठी कौलगे हे ऐकटेच मदतनीस घेऊन पंचनामे करत आहेत.

शेळवे गावचे ग्रामसेवक व कषी सहाय्यक ही शेळवे येथील शेतीचे पंचनामे करण्यासाठी फिरकलेलेच नसल्यामुळे एकट्या तलाठ्याची दोन्ही गावचे शेतीचे व घराचेही पंचनामे करण्यासाठी तारांबळ होत आहे.

शेळवे ( ता.पंढरपूर ) येथील संबधीत अधिकारी सांगतात कि, मला दुसरे गाव दिलेले आहे. मी त्याच गावात पंचनामे करत आहे.
शेळवे येथील सर्वच शेतकरी वर्गातुन शेतीचे सरसकट पंचनामे लवकरात लवकर करुन घेण्याची विनंती होत आहे. शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाईमध्ये पावसाने व महापुराने झालेली पिकांची नासाडी शेताबाहेर काढायलाही पुरत नसल्याचेही शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

भिमा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतातील पिकांची झालेली नासाडी बाहेर काढावी तर पंचनामे झालेले नाहीत, तर शेतीची मशागत करावी तर पुन्हा पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकार्यांना पुरावा काय दाखवायचा अशा द्विधा अवस्थेत शेळवे येथील शेतकरी सापडलेला आहे.

पुरामुळे शेळवे परिसरातील संपुर्ण शेती पाण्याखाली गेल्यामुळे या परिसरातील ऊस ,केळी, मका, द्राक्षे, डाळिंब, आंबा, पेरु व चिंच या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतीच्या पंचनाम्यातून मोठ्या प्रमाणात ऊस शेतीला वगळलेले असल्यामुळे शेतकरी वर्गातुन नाराजी व्यक्त होत आहे.

महापुराचे पाणी ओसरुन आठ ते दहा दिवस होऊन गेले, तरीही आमच्या शेतीचे पंचनामे झालेले नाहीत. पंचनामे कधी होणार , आम्ही शेतीची कामे कधी करणार ! असाही प्रश्न शेतकरी वर्गातुन विचारला जात आहे.

शेळवे येथील शेतीचे पंचनामे ३० % तर खेडभाळवणीचे ९५ % शेतीचे पंचनामे पुर्ण झालेले आहेत. मी एकटाच मदतनीस घेऊन पंचनामे करत आहे. यामुळे जरा वेळ लागत आहे. परंतु पंचनामे सर्वांचे होतीलल कोणीही राहणार नाही.
शेळवे व खेडभाळवणी तलाठी अशी माहिती तलाठी कौलगे यांनी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!