शेळवे परिसरात भिमापुराने जनजिवन विस्कळीत !

भीमा नदीचे रौद्र रूप, शेळवे सह सर्वच गावाचा संपर्क तुटला

शेळवे : ईगल आय मीडिया

उजनी धरणातुन व वीर धरणातुन तसेच लहान मोठ्या ओढे नाल्यामुळे भिमाकाठावरील सर्वच गावातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. शेळवे गावाला पाण्याचा वेढा, हजारो नागरिकांचे स्थलांतर झालेले आहे.

गेल्या पाच दिवसापासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून उजनी धरणातून व वीर धरणातून तसेच लहान मोठ्या ओढे व नाले भरुन वाहत असल्यामुळे अनेकांचा पाण्याचा अंदाज चुकलेला आहे. महापूराचे पाणी शेळवे गावात घुसले असल्याने हजारो नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतरित झालेले आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत.

शेळवे गावाला जोडणारे सर्वच मार्ग पाण्याखाली गेलेले आहेत.शेळवे – खेडभाळवणी ,शेळवे – बरडवस्ती ,शेळवे -भंडीशेगाव या रस्त्यावर १० ते १२ फुट पाणी वाहत आहे. शेळवे ,खेडभाळवणी ,देवडे ,पिराची कुरोली ,वाडीकुरोली या गावातील सर्वच परिसर पाण्याखाली गेलेला असल्याने हा परिसर जलमय झालेला आहे.

या परिसरातील मका ,केळी ,ऊस ,डाळींब ,द्राक्षे ,आंबा ,,पेरु तसेच भाजीपाला व जनावरासाठी लागणारी वैरण ही पाण्यासाठी गेल्यामुळे जनावरांना चार्याची अडचण निर्माण झालेली आहे. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे नदीकाठावर काढुन ठेवलेल्या विद्युत मोटारी सुद्धा पाण्याखाली गेल्या आहेत. तसेच अनेक शेतकर्यांच्या विद्युत मोटारी व पाईपा वाहुन गेलेल्या आहेत.

शेळवे गावाला गेल्या अनेक वर्षापासुन होडी नसल्यामुळे प्रत्येक पुराच्या वेळी होडीची अडचण भासत आहे. शेळवे ग्रामस्थांनी अनेक वेळा शासनाला व लोकप्रतिनिधींना होडीची मागणी केलेली आहे.शेळवे ग्रामस्थांतुन होडीची पुर्तता करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!