साखर कारखान्यांना राज्य बॅकेकडून पैसे मिळण्याची प्रतिक्षा

शेतकरी संघटना व कारखाना प्रतिनिधी यांची प्रांताधिकारी यांनी घेतली बैठक

पंढरपूर : ईगल आय मिडीया
पंढरपूर तालुक्यातील सर्वच कारखान्यांकडे शेतकऱ्यांची एफआरपी, कामगारांचे पगार, तोडणी वाहतूक ठेकेदारांचे पैसे मोठ्या प्रमाणात येणे बाकी आहे. दरम्यान, राज्य बँकेचे कर्ज मिळाल्यानंतर शेतकऱ्यांची देणी देणारच आहोत असे कारखाना प्रतिनिधींकडून बुधवारी प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत मागील बील मिळाल्याशिवाय कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही अस सांगितले.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूरची प्रांताधिकारी सचिन ढोले यांना १७ तारखेला निवेदन देऊन मागील वर्षी च्या थकित ऊसाच्या बिलाची मागणी केली होती. त्याअनुषंगाने प्रांताधिकारी यांनी त्यांच्या दालनात विठ्ठल, सहकार शिरोमणी, सिताराम महाराज, भीमा सहकारी इत्यादी कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांसोबत बुधवारी बैठकीचे आयोजन केले होते.


सहकारी साखर कारखान्याचे संचालक बोर्ड जर कारखाना चालवण्यास असमर्थ असेल तर शासनाने सदर कारखाने ताब्यात घेऊन ते कारखाने चालवावेत व शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करावे अशीही मागणी संघटनेच्या वतीने केल्याचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल व तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी सांगितले.


श्री पांडुरंग सहकारी कारखान्याकडून एफआरपी चे चे तुकडे करणारा मजकूर शेतकऱ्यांकडून सही करून घेतला जातो आहे, ही फार गंभीर बाब असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. सदरचा प्रकार त्वरित बंद करावा स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही परिस्थितीत असे तुकडे होऊ देणार नाही. शेतकऱ्यांना चांगला ऊस दर मिळाळा पाहिजे या भूमिकेवर ठाम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


यावेळी नाना चव्हाण, शहाजहान शेख,यशवंत बागल अजित कोडक, पार्थ सुरवसे दरी गायकवाड, ज्ञानेश्वर डांगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!