शिखर शिंगणापूर मध्ये आजपासून संचारबंदी लागू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलम144 लागू

टीम : ईगल आय मीडिया

महाशिवरात्री च्या पूर्वसंध्येला आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून शिखर शिंगणापूर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दहिवडी चे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी आजपासून 12 मार्चपर्यंत शिखर शिंगणापूर, पाणालिंग देवस्थान, वावरहिरे, शंभू महादेव मंदिर डांगीर वाडी येथे कलम 144 लागू केले आहे.

उद्या ( दि.11 रोजी ) महाशिवरात्री महोत्सव संपन्न होत आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवभक्तांची शंभू महादेवाच्या दर्शनासाठी शिखर शिंगणापूर येथे गर्दी होण्याची शक्यता आहे.

कोरोना मुळे गतवर्षी चैत्री यात्रेपासून शंभू महादेवाचे मंदिर भाविकांसाठी बंद होते. नोव्हेंबर अखेर काही प्रमाणात मंदिर खुले झाले असले तरी सातारा जिल्ह्यात तसेच लगतच्या सोलापूर जिल्ह्यात ही कोरोनाचे रुग्ण परत वाढू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महाशिवरात्री च्या निमित्त गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून दहिवडी उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी 10, 11 आणि 12 मार्च या 3 दिवसांत शिखर शिंगणापूर, वावरहिरे आणि डांगीरे वाडी,मोही येथे संचारबंदी लागू केली आहे.

तसेच या दरम्यान 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास, गुलाल उधळण, साखर,पेढे वाटणे, फटाके फोडण्यास मनाई केली आहे. प्रशासनाच्या या निर्बंधांमुळे शिव भक्तांमध्ये निराशा पसरली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!