पंढरपूर : eagle eye news
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त येथील राणा प्रताप ग्रुपच्या वतीने घरोघरी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यासाठी सजावट स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती राणा ग्रुपचे प्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना प्रताप चव्हाण म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त राणा प्रताप ग्रुप गेली सहा वर्ष घरात होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यासाठी शिवजयंती सजावट स्पर्धा हा उपक्रम राबवत आहे. पुढील पिढीवरती शिव विचारांचे संस्कार व्हावेत, छ.शिवाजी महाराज मुलांना कळावेत यासाठी हा उपक्रम आपण घेत आहोत. या उपक्रमामध्ये पंढरपूर शहरातील इयत्ता ५वी ते १२ वी पर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याने आपल्याच घरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे किंवा पुतळ्याचे पूजन करून त्यासमोर शिव विचारांची, आपल्या संस्कृतीची, सामाजिक संदेश देणारी आरास करावी.
दिनांक 19 फेब्रुवारी दिवशी राणा ग्रुपचे सदस्य घरो घरी जाऊन ही आरास पाहतात. ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे, त्यांना सन्मान पदक व प्रशस्तीपत्रक देऊन कार्यक्रमांमध्ये गौरविले जाईल. तसेच प्रथम,द्वितीय,तृतीय आणि उत्तेजनार्थ येणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात येईल असे सांगून जास्तीत जास्त मुलांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन हि चव्हाण यांनी केले आहे.