शिवसेना नेते मोहन रावले यांचे निधन !

गोव्यात असताना आला हृदयविकाराचा झटका

टीम : ईगल आय मीडिया शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेे ठाकरे याांचे अंगरक्षक ते 5 वेळ खासदार राहिलेले ‘परळ ब्रँड’ मोहन रावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. मोहन रावले हे दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते ५ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. मुंबईतील परळ-लालबाग भागातील ते अत्यंत लोकप्रिय नेते होते. शिवसेनाप्रमुख बााळासाहेब ठाकरे यांचे रावले हे निकटवर्तीय समजले जात. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

रावले यांनी सन १९७९-८४ या काळात भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद सांभाळले होते. १९९१ पासून ते २००९ पर्यंत सलग पाच वेळा दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले आहेत. पुरर्रचित मतदारसंघ झाल्यानंतर मात्र सन २००९ मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

मोहन रावले गेले, असे सांगत कडवट शिवसैनिक, दिलदार दोस्त आणि शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले नेते असे वर्णन करत संजय राऊत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोहन रावले यांची ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक हीच ओळख होती. मोहन रावले पाच वेळा खासदार झाले, मात्र अखेरपर्यंत ते सगळ्यांसाठी मोहनच राहिले असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मोहन रावले यांचे पार्थिव मुंबईत अंत्यविधीसाठी आज संध्याकाळी आणलं जाणार आहे. दादर मधील त्यांच्या घरी पार्थिव आणल्यानंतर त्यांची कर्मभूमी परळ शिवसेना शाखेत त्यांचे पार्थिव शिवसैनिकांना अंतीम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!