पंढरीत भाजप नेत्याच्या तोंडाला काळे फासले, बांगड्या घातल्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती टीका

भाजप नेत्याच्या तोंडाला काळे फासले, vdo पहा !

टीम : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहर भाजपचे माजी अध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या तोंडाला शिवसैनिकांनी आज काळे फासले आणि त्यांना बांगडयाचा हार घातला. शुक्रवारी कटेकर यांनी भाजपच्या मोर्चात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वापरलेली भाजपच्या नेत्याची शिवराळ भाषा

ज्याने ज्वेलर्स च्या नावाखाली स्वतः बँकेत घोटाळा केला आहे, त्याला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याचा कसलाही अधिकार नाही. ज्यांना आपले ज्वेलर्स चे दुकान बंद करून खानावळ टाकली आहे, त्यांनी आपल्या नेत्यांना जाब विचारावा, दुसऱ्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. म्हणून आज वाचाळ, फ्रॉड अशा भाजपच्या त्या नेत्याला आम्ही काळे फासून त्यांची प्रतिमा दाखवली आहे : संदीप केंदळे, माजी शहरप्रमुख शिवसेना, पंढरपूर

त्यामुळे आज ( शनिवारी ) शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष संदीप केंदळे यांच्यासह सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिरीष कटेकर यांना जाब विचारून त्यांच्या अंगावर काळे ऑइल5 ओतले. तसेच तोंडाला काळे फासले. त्याचबरोबर कटेकर यांना बांगडयाचा हार घालून त्यांच्या वक्तव्या चा निषेध केला. त्यांना साडी, बांगड्याचा हार आणि बुक्का लावून काळे फासले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!