शैला गोडसे यांच्या उमेदवारीची मुख्यमंत्र्यांना मागणी करणार : शिवाजीराव सावंत
मंगळवेढा : ईगल आय मीडिया
मंगळवेढा-पंढरपूर या मतदारसंघाची मुळची जागा ही शिवसेनेची असून आमच्या पक्षाचा आमदार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून ही जागा शिवसेनेसाठी सोडावी अशी मागणी करणार असल्याचे सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना समन्वयक शिवाजीराव सावंत यांनी सांगितले. ते शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांच्या मंगळवेढा येथील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, मोहोळ तालुका प्रमुख अशोक भोसले, माजी तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत, पंढरपूर शहर प्रमुख रविंद्र मुळे, मंगळवेढा तालुका सन्मवयक श्रीशैल कुंभार, मंगळवेढा शहर सन्मवयक नारायण गोवे, माऊली आष्टेकर, महिला आघाडी मंगळवेढा शहर प्रमुख शारदाताई जावळे, पंढरपूर महिला आघाडी शहर प्रमुख पुर्वा पांढरे उपस्थित होते.
पुढे बोलताना शिवाजीराव सावंत म्हणाले की, शैला गोडसे यांच्या संपर्क कार्यालयात जास्तीत जास्त महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय सुरू केले आहे. मंगळवेढा तालुक्यात व पंढरपूर तालुक्यातील विकासासाठी शैला गोडसे यांनी अनेक आंदोलने केली आहेत व त्यामधून जनतेला न्याय मिळवून देण्यात त्यांना यश ही आले आहे. मंगळवेढा-पंढरपूर ची जागा ही मुळात शिवसेनेची आहे. जागा वाटपात भाजप ला गेली होती. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून मागणी करणार आहोत आता ही जागा शिवसेनेला द्यावी आणि शैला गोडसे यांना उमेदवारी मिळावी असे त्यांनी सांगितले.
संभाजी शिंदे म्हणाले की, विधानपरिषदसाठी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे शैला गोडसे यांच्यासाठी मागणी केली होती. पण वाटपामध्ये ही जागा दुसऱ्या पक्षाकडे गेली होती. मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावे व पंढरपूर तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी साठी आपण धावून गेलात, ही जनता आपल्याला विसरणार नाही. हा मतदारसंघ शिवसेनेकडे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेश वानकर बोलताना म्हणाले की, आजपासून हे कार्यालय नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सुरू केले आहे.ग्रामीण भागातील जनतेची कामे मार्गी लागणार आहेत. भावी आमदार म्हणून शैला गोडसे यांना आम्ही पाहत आहे. आपण केलेली कामे पाहता शिवसेना पक्ष व आम्ही तुम्हाला आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे गणेश वानकर यांनी सांगितले.
याप्रसंगी विधानसभा संघटक संगीता पवार, रेहना शेख,सुप्रिया कदम,संगीता पवार,अरूण मोरे,बाळासाहेब सरवळे,संदिप डोके, सुरज नकाते,महातेश पाटील,विजयकुमार भरगुडे, परमेश्वर कोळी, राहूल घोडके, आण्णा भोजणे, संदिप बाबर, रविंद्र कदम, आनंद जाधव, बिराप्पा ढाणे,कमलाकर कदम, सुधीर जाधव, गोकुळ बैरागी,उपशहर प्रमुख लंकेश बुरांडे, अविनाश वाळके,उपतालुका प्रमुख उपशहर प्रमुख विभागप्रमुख गटप्रमुख शाखाप्रमुख ग्राहक संरक्षण कक्ष युवासेना महिलाआघाडी संघटनेचे आजी माजी पदाधिकारी सर्व शिवसैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले आहेत.तर आभार विनोद कदम यांनी मानले.