नरूटेवाडी येथे शेतकरी मेळावा : शिवसेना नेते राजू खरे यांनी कालव्याची पाहणी केली

पंढरपूर : eagle eye news
मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही गावासाठी वरदान ठरलेल्या शिरापूर उपसा सिंचन योजनेतील सहा ते सात गावे अजूनही योजनेच्या पाण्यापासून वंचित आहेत. या गावांना हक्काचे पाणी मिळणे आवश्यक असताना कुणाच्या तरी दबावाखाली कालवा असतानाही पाण्यासाठी शेतकऱ्यांना झगडावे लागत आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लावू आणि लाभक्षेत्रातील सर्व क्षेत्रास पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही शिवसेना नेते, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सांभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे यांनी दिली.
रविवारी नरूटेवाडी ( ता. मोहोळ ) येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात खरे बोलत होते. तत्पूर्वी राजू खरे यांनी प्रत्यक्ष कालव्याची आणि शिरपूर उपसा सिंचन योजनेतील लाभक्षेत्राची पाहणी केली. यावेळी शिवसेना सोलापूर शहर प्रमुख मनोज शेजवाल, उमेश गायकवाड, सागर शितूळे, जावेद भाई पटेल, बजरंग देवकर, आकाश गजघाटे,सेवालाल नगरचे सरपंच लक्ष्मण राठोड, शिवसेना तालुका उपप्रमुख नंदकुमार गवळी,
बि.बीदारफळचे शिवाजी ननवरे, उमाकांत करंडे, अनिकेत लोंढे,
जीवन देवकर, उपशाखा प्रमुख विजय कसबे, अमर तोडकर, युवा विशाल जाधव आदी उपस्थित होते.
मोहोळ तालुक्यातील नरूटेवाडी सह इतर गावांना याच पाण्याचे आवर्तन मंजुर असताना देखील काही तांत्रिक कारणास्तव पाणी मिळत नाही. लोकांनी लोकवर्गणीतून शिरापूर उपसा सिंचनला कालवा तयार करून जोडला, मात्र ज्या ठिकाणी कालवा तयार केला गेला त्याचा मोबदलाही बाधित शेतकऱ्यांना दिला गेला नाही. तांत्रिक अडचणी सांगून काही गावांना या पाण्याचा लाभ भेटत नाही. या भागातील सर्व शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे व स्थानिक राजकीय नेत्यांकडे वारंवार जाऊनही याची दखल घेतली नाही.
मात्र शिवसेना नेते व उद्योजक राजू खरे यांना या भागातील शेतकऱ्यांनी अडचण सांगितल्यानंतर प्रत्यक्ष कालव्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. कालव्यातील काही तांत्रिक अडचणी दूर केल्यास नरुटेवाडीसह पुढे असलेल्या 6 ते 7 गावांना या पाण्याचा लाभ मिळू शकणार आहे. येणाऱ्या काही दिवसातच हा रखडलेल्या कालव्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे राजाभाऊ खरे यांनी यावेळी सांगितले. या शेतकरी मेळाव्यास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.