अकोलेकाटी येथे शिवसेनेच्यावतीने इफ्तार पार्टी

शिवसेनेचे नेते राजाभाऊ खरे यांनी केले इफ्तार पार्टीचे आयोजन

पंढरपूर : eagle eye news

अकोलेकाटी ( ता. उत्तरसोलापूर ) येथे शिवसेना शिंदे गटाच्यावतीने रमजान महिन्या निमित्त मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते आणि मोहोळ विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना केली. यावेळी राजाभाऊ खरे यांनी मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या तर मुस्लिम बांधवानी राजाभाऊ खरे यांच्या मोहोळ विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी प्रार्थना केली.

रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात आणि उपवास सोडण्यासाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. या महिन्यातील अखेरचे पाच ते सहा दिवस रात्रभर जागून प्रार्थना केली जाते. शिवसेनेच्यावतीने राजाभाऊ खरे यांनी आयोजित केलेली इफ्तार पार्टी शनिवार दि ३० मार्च रोजी संपन्न झाली. या इफ्तार पार्टीसाठी गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी उपवास सोडण्यासाठी खजूर, सफरचंद, चिकू, पपई अशा अनेक फळांची मेजवानी यानिमित देण्यात आली होती.

यावेळी फिरोज पठाण, शिवसेना सोलापूर जिल्हा सचिव जावेद भाई पटेल, शिवसेना तालुका उपप्रमुख उमाकांत करंडे, युवासेना तालुकाप्रमुख आकाश गजघाटे, समन्वयक अश्फाक शेख, गटप्रमुख लक्ष्मण राठोड, मुकुंद जांभळे, शाखाप्रमुख केशव गोरे, संजय लंबे, हमीद मुलानी, कचरू मुलानी, शाहीद मुलानी, शेखलाल शेख, जावेद शेख, साकी पठाण, शौकत मुलानी, पीर साहब मुलानी, सलीम शेख, मनोरंजन जाधव, रंगनाथ गुरव, अरुण जाधव, अफसर मुलानी मुस्लिम बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!