बैल गाडीतून दाखल झाली शैला गोडसे यांची उमेदवारी !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. शैला गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.सौ गोडसे यांची एकूणच तयारी पाहता यावेळी त्या माघारी घेणार नाहीत असे दिसते. त्यांची उमेदवारी राष्ट्रवादी ला अडचणीत आणणार की विरोधकांना याकडे लक्ष लागले आहे.

शैला गोडसे या गेल्या विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारी मागत होत्या मात्र, गेल्यावेळीही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. अखेरीस शैला गोडसे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे पाऊल टाकले आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात गेल्या १० वर्षांपासून मी काम करीत असून गेल्यावेळी उमेदवारी डावलल्यावरही मी पक्षादेश मनाला होता. यंदा देखील शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष या दोघांचीही भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

आज हलगीचा कडकडाट, महिला व मुलींची दुचाकी रॅली, पाठोपाठ सजवलेली बैलगाडी चालवत शैला गोडसे या अर्ज दाखल करायला पोचल्या. शैला गोडसे यांनी शक्तिप्रदर्शन केल्याने आता त्या माघार घेणार नाहीत हेच दिसून येत आहे..

Leave a Reply

error: Content is protected !!