डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून पत्रकारांना मदतीचा हात

राज्यभरात पत्रकाराना प्रथमोपचार किट : सांगलीत आरोग्य शिबीर

टीम : ईगल आय मीडिया

डॉ.खा.श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने राज्यभरात पत्रकारांना वैद्यकीय मदत केली जात आहे. राज्यातील 3 हजारांहून अधिक पत्रकारांना प्रथमोपचार किट चे वाटप केले आहे. तर कोरोना काळात मयत झालेल्या 20 पत्रकारांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत सार्व. बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय उपचारासाठी राज्यातील गरजूंना शासकीय योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय कक्षातून प्रयत्न झाले आहेत, अशी माहिती शिवसेना वैधानिक कक्ष प्रमुख आणि पत्रकार मंगेश चिवटे यांनी दिली. पंढरपूर येथे 100 हुन अधिक पत्रकारांना मंगळवारी मंगेश चिवटे यांच्या हस्ते प्रथमोपचार किट्स चे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, जेष्ठ नेते जयवंतराव माने, शहराध्यक्ष रवी मुळे, जिल्हा उप प्रमुख सुधीर अभंगराव, माजी उपनगराध्यक्ष संजय घोडके, माजी शहर प्रमुख संदीप केंदळे, महेश साठे, पै.सिद्धेश्वर कोरे आदी उपस्थित होते. यावेळी स्वागत संभाजीराजे शिंदे यांनी केले तर आभार जेष्ठ पत्रकार सुनील उंबरे यांनी मानले.

कार्डियाक रुग्णवाहिका देणार , कोरोना काळात सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांची रुग्णवाहिके अभावी मोठी गैरसोय , झाली, आर्थिक लूट ही झाली. ही गोष्ट लक्षात घेऊन डॉ.खा. श्रीकांत शिंदे फाउंडेशन कडून करमाळा तालुक्यासाठी एक कार्डियाक रुग्णवाहिका लवकरच देण्यात येणार असल्याचे यावेळी चिवटे यांनी सांगितले.

यावेळी पुढे बोलताना चिवटे म्हणाले की, राज्यात पहिल्या दोन्ही कोरोना लाटांच्या संकटकाळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या काही पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले. या खऱ्या कोविड योध्याच्या कुटुंबियांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयातील दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.

मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार स्व.जयंत करजवकर , मुंबई कार्यालयात काम करणारे News 18 लोकमतचे पत्रकार स्व.विठ्ठल मांजरेकर , तसेच संभाजीनगर येथील सामनाचे पत्रकार स्व. राहुल डोलारे यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली. दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या परिवाराला नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडून 5 लाख रूपयांची मदत दिली गेली.

यावेळी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री दिलीप सपाटे, उपाध्यक्ष श्री दीपक भातुसे, माजी कार्यवाह श्री प्रमोद डोईफोडे, श्री सोनू श्रीवास्तव तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी श्री मयुरेश गणपते, श्री राजू सोनवणे , शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विभागप्रमुख श्री मंगेश चिवटे हे देखील उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!