शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडी ची धाड

टीम : ईगल आय मीडिया

शिवसेनेचे आमदार आणि अभिनेत्री कंगना राणावत, रिपब्लिक tv चे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या आ. प्रताप सरनाईक यांच्या घरावर, कार्यालयावर सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीने छापा टाकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक दाखल झालं आहे. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली असून एकूण १० ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे. कारवाईचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.

प्रताप सरनाईक यांनी रिपब्लिक भारत टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात हक्क भंग प्रस्ताव दाखल केला आहे, तसेच अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई पाकव्याप्त काश्मीर असल्याचे म्हटल्यावर तिच्या विरोधात ही आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे तर ही धाड पडली नाही ना ? अशी शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.

मंगळवारी सकाळी, शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकल्याची माहिती मिळत आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांवर सकाळी छापा टाकण्यात आला आहे.

प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं असल्याचं कळत आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ईडीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही.

Leave a Reply

error: Content is protected !!