शैला गोडसे यांची सेनेतून हकालपट्टी

महाविकास आघाडीविरोधात केलेली बंडखोरी भोवली

टीम : ईगल आय मीडिया

 पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्याबद्दल पक्ष शिस्तभंगाचा ठपका ठेऊन शिवसेनेने महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ. शैलाताई गोडसे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. शिवसेना हा महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असून सहकारी पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंड केल्यानंतर शिवसेनेने आघाडी धर्म पाळला असल्याचे दिसून येते.


शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ. शैला गोडसे यांनी या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल केेल्या नंंतर शिवसेनेनेे सौ गोडसे याना अर्ज काढून घेण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र गोडसे यांनी अर्ज माघारी घेण्यास नकार दिल्याने पक्षाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पंढरपूर पोटनिवडणूक महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. महाविकास आघाडीने पंढरपुरात संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी मंगळवारी पंढरीत झालेल्या महाविकास आघाडीच्या मंचावर सर्व घटक पक्ष आणि नेते उपस्थित होते.

या पार्श्वभूमीवर सौ.गोडसे यांच्यावर कारवाई होणार असल्याचे निश्चित मानले जात होते. शिवसेनेने वेळेतच ही कारवाई करून महाविकास आघाडी कोणत्याही स्वरूपाची बंडखोरी सहन करणार नाही याचे संकेत दिले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!