श्रमिक पत्रकार संघ : अध्यक्षपदी समाधान गायकवाड, कार्याध्यक्षपदी मोहन डावरे

उपाध्यक्षपदी सचिन शिंदे आणि बजरंग नागणे, यांची तर खजिनदारपदी सावता जाधव, सचिव म्हणून  घनश्याम शिंदे


 प्रतिनिधी : eagle eye news

पंढरपूर  श्रमिक पत्रकार संघाच्या  अध्यक्षपदी ऍड. समाधान गायकवाड, तर कार्याध्यक्षपदी मोहन डावरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.  श्रमिक पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारिणी निवडी संदर्भात बुधवारी संघाची बैठक संपन्न झाली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार सिध्दार्थ ढवळे अध्यक्ष स्थानी होते. यावेळी संघाचे मावळते अध्यक्ष नवनाथ पोरे, कार्याध्यक्ष सुनिल उंबरे आदींनी आपल्या वर्षभरातील केलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा सांगितला.

यावेळी नूतन उपाध्यक्षपदी सचिन शिंदे आणि बजरंग नागणे, यांची तर खजिनदारपदी सावता जाधव, सचिव म्हणून  घनश्याम शिंदे यांची एकमतानी निवड करण्यात आली.

या निवडीच्या  वेळी पत्रकार  शिवाजी शिंदे, अरूण बाबर, सतिश बागल, महालिंग दुधाळे, सचिन कांबळे, सुर्यकांत बनकर, भिमा व्यवहारे, शहाजी काळे, सुधाकर कवडे, मोहन कोळी, उत्तम बागल, गणेश गायकवाड, सुनिल कोरके, कल्याण कुसुमडे, समाधान काळे, नितीन शिंदे आदींसह श्रमिक पत्रकार संघ पंढरपूरचे सर्वजन उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!