भगीरथ भालके यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता
पंढरपूर : ईगल आय मीडिया
आम.भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची निवड येत्या सोमवारी ( दि.21 डिसेंबर ) रोजी होत आहे. सहायक निबंधक एस. एम. तांदळे यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळाची मीटिंग बोलावण्यात आली आहे. यावेळी चेअरमन पदाची निवड करण्यात येणार आहे.
भगीरथ भालके यांनाच संचालक मंडळाची पसंती ? कारखान्याच्या चेअरमनपदी आ.भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बहुतांश संचालकांनी सुद्धा भारत नाना यांच्या नंतर भगीरथ यांचीच चेअरमनपदी निवड करावी, अशी ईच्छा बोलून दाखवल्याने भगीरथ भालके यांचीच निवड होण्याची शक्यता आहे.
28 नोव्हेंबर रोजी कारखान्याचे चेअरमन आ.भारत भालके यांचे निधन झालं आहे. त्यामुळे चेअरमन पद रिक्त झाले असून या पदाच्या निवडीसाठी सर्व संचालकांना या निवडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. नवीन चेअरमन पदी कुणाची वर्णी लागते याकडे विठ्ठल परिवारासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.