विठ्ठलच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यास राज्य सहकारी बॅंकेची तयारी

आर्थिक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामातील अडचणी अजूनही कायम असल्या तरी पुणे येथे झालेल्या बैठकीत महत्वाचे प्रश्न मार्गी लागल्याने लवकरच आर्थिक प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत असून हंगामपूर्व कर्ज मिळण्यात अडचणी असल्याने याबाबत मार्ग काढण्यासाठी आज पुणे येथे विठ्ठल च्या संचालक मंडळाची बैठक खा.शरद पवारांनी बोलावली होती.

या बैठकीस खा. पवारांसह राज्य सहकारी बँकेचे प्रशासक अनास्कर, साखर आयुक्त शेखर गायकवाड विठ्ठल चे चेअरमन भगीरथ भालके, उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, युवराज पाटील, समाधान काळे आदी उपस्थित होते.

यावेळी पवारांनी कारखान्याच्या संचालक मंडळाशी चर्चा केली आणि आर्थिक अडचणी जाणून घेतल्या. राज्य सहकारी बँकेने कर्जाचे पुनर्गठन करण्यास परवानगी दिल्यास दुसरीकडून कर्ज उपलब्ध होईल असे संचालक मंडळाने सांगितले. त्यावर राज्य बँकेच्या प्रशासकांनी कर्जाचे पुनर्गठन करण्यास परवानगी देता येईल असे सांगितले. त्याचबरोबर अन्य आर्थिक संस्थेसोबत अर्थसहाय्य घेण्यासाठी लागणाऱ्या मान्यता ही देण्याची तयारी दाखवली आहे.

मात्र लगेचच या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. तोवर संचालक मंडळाने एकत्र बसून आर्थिक अडचणी दूर कराव्यात अशा सूचना सूचना खा.पवारांनी दिल्या आहेत.त्यानंतर मीटिंग संपली.

कारखान्यास तातडीने हवी असलेली आर्थिक मदत आजच्या बैठकीतुन मिळाली नसली तरी आर्थिक कोंडी दूर करण्यासाठीचे मार्ग बऱ्याच प्रमाणात मोकळे झाले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात विलंब लागला तरीही विठ्ठल सहकारी या हंगामात सुरू होण्याची अपेक्षा आजच्या बैठकीनंतर बळावली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!