ऑनलाइन नोंदणी शिवाय विठ्ठल दर्शन नाही

दररोज 1 हजार भाविकांना फक्त मुखदर्शन मिळणार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उद्या ( सोमवार ) पासून श्री विठ्ठलाचे मंदिर भाविकांसाठी खुले होत असले तरी ऑनलाइन दर्शन बुकिंग केलेल्या भविकानाच केवळ मुख दर्शन मिळणार आहे. राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याचे आदेश दिल्या नंतर यासंदर्भात आज मंदिर समितीच्या बैठकीत विठ्ठल दर्शनाबाबत आचार संहिता तयार करण्यात आली.

त्यानुसार सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत दर तासाला केवळ 100 लोकांनां मुख दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. त्याकरिता भाविकांना online बुकिंग करावे लागणार आहे. शिवाय ज्यांचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांनाच तपासणी करून मंदिरात सोडले जाणार आहेत. गरोदर महिलांना ही मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

सर्व भाविकांना श्री विठ्ठल आणि रुक्मिणी चे केवळ मुख दर्शन मिळणार आहे. मंदिरात आल्यानंतर भाविकांचे थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे, त्यावेळी तापमान संशयास्पद आदळून आले तर प्रवेश नाकारण्यात येणार आहे. भाविकांना स्यानेटाईझर मंदिर समिती कडून पुरवला जाणार आहे.

कार्तिकी यात्रे संदर्भात शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला असून आषाढी यात्रेच्या पद्धतीने कार्तिकी यात्रा ही साजरी केली जाईल असे सांगितले जाते. शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा समिती प्रशासनाला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!