हे आहेत श्री विठ्ठलाच्या महापूजेचे मानकरी

शासकीय महापूजेस उपस्थितीचा विणेकऱ्यास मिळाला मान

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेले 10 वर्षे विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावणाऱ्या वृद्ध वारकरी कवडुजी नारायण भोयर आणि त्यांच्या पत्नीस यंदा श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे. मंदिर समितीच्या वतीने चिट्ठी काढून ही निवड करण्यात आल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी यांनी सांगितले.


मंदिरात पहारा देणा-या एकूण 6 विणेक-यांपैकी श्री.कवडुजी नारायण भोयर वय ( 64 वर्षी रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा ) आणि सौ.कुसुमबाई कवडूजी भोयर, ( वय 55 ) याची निवड करण्यात आली आहे. श्री.कवडुजी नारायण भोयर हे मागील 9 ते 10 वर्षापासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहे. ते स्वतः व त्यांचे कुटुंबिय देखील माळकरी आहेत. मागील 8 महिन्यांपासून लाॅकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते मंदिरात सेवा करीत आहेत.

दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रेला शासकीय महापूजेच्या वेळी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान दर्शन रांगेतील वारकरी दाम्पत्यास दिला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे कार्तिकी यात्रा प्रतिकात्मकरित्या साजरी होत आहे. दर्शन रांगेतील वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून विठ्ठल मंदिरात पहारेकरी म्हणून वीणा वादन करणाऱ्या वारकऱ्यांपैकी चिट्टी काढून या वारकरी दाम्पत्याची निवड करण्यात आली.

Leave a Reply

error: Content is protected !!