माघ वारी : श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न

पंढरपूर : ईगल आय मीडिया

माघवारी जया शुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. यावेळी श्री विठ्ठलाची पुजा मंदीर समितीच्या सदस्या अँड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत झाली.

विठ्ठलमंदिर फुलांची आरास पहा : लिंकवरून vdo पहा

रुक्मिणी मातेची पूजा मंदीर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थित संपन्न झाली. यावेळी मंदीर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे, मंदीर समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

1 टन फुलांनी सजवला गाभारा। माघ वारी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. याकरिता सुमारे 1 टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. गाभाऱ्यात गरुडाची प्रतिकृती फुलांमध्ये बनवण्यात अली असून विठ्ठल गरुडावर आरूढ झाल्यासारखे सुंदर चित्र दिसून येत आहे.


माघवारी जयाशुध्द एकादशी निमित्त मंदिरात वतीने आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदीर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

Leave a Reply

error: Content is protected !!