सोन्याचं बाशिंग, लगीन देवाचं लागलं

विठ्ठल – रुक्मिणी चा विवाह सोहळा संपन्न

श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा पहा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

मंगळवारी वसंतपंचमी दिवशी श्री विठ्ठल व रूक्मिणीचा विवाह सोहळा पंढरपूरमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल रखुमाई यांचा विवाह सोहळा झाला. मंदिरे समिती सह अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदिरातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली होती. ह भ प गहिनीनाथ औसेकर महाराज, विठ्ठल जोशी यांनी देवाच्या लग्नात मंगल अष्टका म्हटल्या.

घरी मंदिरे समितीच्या वतीने विवाहाची जय्यत तयारी करण्यात आली होती. पाच टन विविध फुलांनी मंदिर सजविले गेले होते. श्री विठ्ठलासाठी पांढर्‍या रंगाची अंगी व उपरणे बनविण्यात आले आहे. रुक्मिणी मातेलाही अतिशय उंची सिल्कची कांजीवरम साडी निवडण्यात आली आहे.

पुण्यातील फुल सजावटीची सेवा देणारे भारत भुजबळ हे पाच टन फुलांनी मंदिर सजविले होते. यात थोरियम, विविध रंगी गुलाब, ओर्केड ,जरबेरा, मोगर्‍यासह 36 प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. या विवाह सोहळ्यानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात रूक्मिणी स्वयंवराची कथा भागवताचार्य अनुराधा शेटे यांनी सांगितली.

Leave a Reply

error: Content is protected !!