श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अभिजित पाटील

तर उपाध्यक्षपदी सौ प्रेमलता रोंगे यांची निवड

टीम : ईगल आय न्यूज

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अभिजित पाटील तर उपाध्यक्षपदी सौ प्रेमलता रोंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांच्या उपस्थितीत हि निवड करण्यात आली.

see the video

संपूर्ण तालुक्याचे लक्ष असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी अपेक्षेप्रमाणे अभिजित पाटील यांची तर उपाध्यक्ष पदी सौ प्रेमलता रोंगे यांची निवड झाली आहे. आज श्री विठ्ठल कारखान्यावर संचालक मंडळाची चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी बैठक संपन्न झाली.

व्हीडिओ।पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा

यावेळी सर्वानुमते अध्यक्ष पदी अभिजीत पाटील यांची तर उपाध्यक्ष पदी डॉ. बी पी रोंगे यांच्या सौभाग्यवती संचालिका प्रेमलता रोंगे यांची निवड झाली. निवडीनंतर नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी कारखान्याच्या आगामी गाळप हंगामासाठी मिल रोलर चे पूजन करण्यात आले. यानिमित्त हभप हंडे महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले.


चेअरमनपदी निवड झाल्यानंतर अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणार असून थकीत ऊस बिल दिल्याशिवाय कोणत्याही गावात गेल्यानंतर सभासदांचा सत्कार स्वीकारणार नाही अशी घोषणा केली. आगामी गाळप हंगाम १ ऑक्टोबररोजी सुरु करण्याचे उद्दिष्ट असून १२ ते १५ लाख टन ऊस गाळपाचे नियोजन सुरु असल्याचे सांगितले. यावेळी सर्व संचालक, शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!