सुवर्णरंगी फुलांनी बहरले विठ्ठल मंदिर

श्री विठ्ठल मंदिरात झेंडूच्या फुलांची, आपट्याच्या पानांची सजावट !

पंढरपूर : ईगल आय मीडिया


श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विजयादशमी (दसरा) निमित्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात झेंडूच्या फुलाची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे.

व्हीडिओ पहा आणि चॅनेल subscribe करा

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रत्येक राष्ट्रीय आणि सांस्कृतिक सणाच्या दिवशी विठ्ठल मंदिरात विविध फुले, फळांची आरास आणि सजावट केली जाते. यासाठी विजया दशमीच्या सणामध्ये सुवर्ण रंगी झेंडूच्या फुलांचे आणि आपट्याच्या पानांचे महत्व असते. त्यामुळे आज विठ्ठल मंदिरात झेंडूची फुले आणि आपट्याची पाने यांची सजावट करण्यात आलेली आहे.

कोरोनामुळे श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी दर्शना करिता बंद असले तरी मंदिर समितीच्यावतीने online दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच गाभाऱ्यातील सजावट आणि विठ्ठल, रुक्मिणी मूर्तीचा पोशाखाचे व्हीडिओ आणि फोटो प्रसिद्धीस देऊन भाविकांना सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाचा योग घडवला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!