2 वर्षाचा मुलगा मंदिरात गेला : मंदिर अशुद्ध झाले

शुद्धीकरणासाठी कुटुंबाकडे 35 हजार रुपयांची मागणी : 5 जणांना अटक

टीम : ईगल आय मीडिया

वाढदिवसाच्या निमित्ताने देवाच्या दर्शनास 2 वर्षाचा दलित समाजातील मुलगा मंदिरात गेला म्हणून मंदिर शुद्धीकरण करण्यासाठी 25 हजार आणि दंड 10 हजार रुपये असे एकूण त्या मुलाच्या कुटुंबाला 35 हजार रुपये मागीतल्याची गंभीर घटना कर्नाटकात समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित कुटुंबाने याबाबत पोलिसात तक्रार करण्यास नकार दिला, मात्र शेवटी पोलिसांनीच गुन्हा दाखल करून 5 जणांना अटक केली आहे.

कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील मियापूर गावात ही घटना ४ सप्टेंबर रोजी घडली होती. गावातील अनुसुचित जाती – जमातीतील एका दलित कुटुंबातील अवघ्या दोन वर्षांच्या मुलानं मंदिरात प्रवेश केला होता. दलित मुलाच्या प्रवेशामुळे मंदिर अशुद्ध झाल्याचा दावा काही जणांकडून करण्यात आला होता. परंतु, गेल्या सोमवारी यासंबंधात एक तक्रार दाखल करण्यात आली होती.

चेन्नादासर समाजाशी संबंधीत चंद्रशेखर ४ सप्टेंबर रोजी आपल्या दोन वर्षांच्या मुलाला त्याच्या वाढदिवसानिमित्तानं मंदिरात हनुमानाच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ इच्छित होता. चंद्रशेखर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य बाहेर उभे होते तर लहान मुलगा मंदिरात गेला. त्यामुळे मंदिरातील पुजारी संतप्त झाला आणि वादानंतर ही घटना संपूर्ण गावभर पसरली. ज्या अनुसूचित जातीतील कुटुंबासोबत हा प्रकार घडला त्यांनी मात्र कोणतीही तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.

उच्च जाती-जमातीतील काही जणांकडून पुजाऱ्यांची बाजू उचलून धरली आणि११ सप्टेंबर रोजी गावात एक बैठक बोलावण्यात आली. यामध्ये मंदिरात गेल्याबदल दंड आणि शुद्धिकरणासाठी खर्च पीडित कुटुंबाकडून म्हणून 35 हजार रुपये मागितले गेले. इतर ग्रामस्थांनी याचा जोरदार विरोध केला. गावातच या प्रकरणामुळे दोन गट पडले आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं.

दलित कुटुंबीयांनी प्रवेश केला म्हणून मंदिर ‘अशुद्ध’ झाल्याचा दावा करून गावातील उच्च वर्गीयांकडून मंदिराच्या शुद्धीकरणासाठी दलित कुटुंबाकडून दंडाच्या स्वरुपात 35 हजार रुपये मागण्यात आले होते. या प्रकरणात कारवाई करत पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक टी श्रीधर यांनी दिलीय.

Leave a Reply

error: Content is protected !!