सिरम इन्स्टिट्यूट च्या आगीत 5 जणांचा मृत्यू

पोलीस तपास होणार : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

टीम : ईगल आय मीडिया

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, याप्रकरणी पोलीस चौकशी करत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली असून पोलीस तपासासोबत फायर ऑडिटही केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. मृत्यू झालाले बांधकाम मजूर असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.


सीरम इन्स्टिट्यूट आगीत 5 मृृत्यू
“आग विझल्यानंतर आत जाऊन पाहिलं असता पाच मृतदेह सापडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मला ही माहिती दिली,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं. राजेश टोपे यांनी यावेळी कोव्हिशिल्ड लसीला कोणताही फटका बसला नसल्याचं यावेळी सांगितलं.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, “जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत मी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्डिंगचं काम सुरु असताना दुपारी २ वाजता आग लागली. वेल्डिंगचं निमित्त होतं मात्र तेथील ज्वलनशील सामानामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली.

आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी हे काम सुरु होतं. पण दुर्दैवाने पाच जणांना जीव गमवावा लागला असल्याचे टोपे यांनी सांगितले. महापालिकेचे पाच टँकर आणि तीन पाण्याचे टँकर तात्काळ बोलावण्यात आले होते. संपूर्ण आग विझवण्यात आली असून दोन ते तीन तास लागले. संपूर्ण आग विझली असून सर्व काही नियंत्रणात आहे”.

Leave a Reply

error: Content is protected !!