कल्याणराव काळे यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष दीपक पवारांची माहिती

पंढरपूर : ईगल आय मीडिया

कल्याणराव काळे यांनी अलीकडेच विक्री केलेल्या सिताराम महाराज साखर कारखान्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष ऍड.दीपक पवार यांनी ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. राष्ट्रवादी च्याच दोन नेत्यांमध्ये रंगलेल्या वादामुळे दिवाळीत राजकीय फटाके जोरदार फुटणार आहेत.

सिताराम महाराज साखर कारखान्यासाठी श्री. काळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कारखान्याचे शेअर्स देतो असे सांगून शेतकरी,कामगार, शिक्षक आणि वाहन मालक अशा जवळपास 15 हजार लोकांकडून सुमारे 35 कोटी रुपये गोळा करुन त्याचा घोटाळा केल्याचा आरोप पवर यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

आरोप पूर्णपणे खोटे

माझ्या संदर्भात करण्यात आलेले आरोप पूर्णतः खोटे आहेत.असा कोणताही आर्थिक घोटाळा केलेला नाही. या संदर्भात मी कायदे तज्ञांचा सल्ला घेवून पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे. अशा चुकीच्या आरोपावर शेतकर्यांनी विश्वास ठेवू नये.

कल्याणराव काळे, अध्यक्ष सहकार शिरोमणी वसंतराव काळे
साखर कारखाना


अॅड दिपक पवार म्हणाले की, खर्डी (ता.पंढरपूर) येथील सिराताराम महाराज साखर कारखान्यामध्ये कल्णाराव काळे यांच्यासह संचालक व कार्यकारी संचालक यांनी हजारो लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. सन 2010 ते 2015 या दरम्यान सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याकडे ऊस दिलेल्या शेतकरी, कामगार, ट्रॅक्टर मालक, व्यापारी व शिक्षण संस्थेतील कर्मचार्यांकडून शेअर्स देतो म्हणून सुमारे 35 कोटी रुपये गोळा केले आहेत. हे पैसे घेतल्यानंतर अनेकांना पावत्याही दिल्या नाहीत.

तालुक्यातील अनेक शेतकर्यांकडून शेअर्स पोटी पैसे गोळा केेले आहे. परंतु वाडीकुरोली, पिराचीकुरोली आणि धोंडेवाडी या तीन गावातील 4 हजार 952 शेतकर्यांची नावे शेअर्सच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अन्य शेतकऱ्यांनी भरलेल्या
पैशाचे काय असा सवालही श्री. पवार यांनी उपस्थित केला आहे. कारखान्याच्या सर्व आर्थिक व्यवहाराची कसून चौकशी करावी अशी लेखी तक्रार ईडी, आयटी, सेबी आदी संस्थांसह जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.लवकरच याप्रकरणाची चौकशी सुरु केली जाईल असे ईडीच्या अधिकार्यांनी सांगितले आहे. चौकशी नंतर श्री. काळे यांचा मोठा आर्थिक घोटाळा समोर येईल असेही
श्री.पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!