विठ्ठल, भीमा, सहकार महर्षी, दामाजी, सहकार शिरोमणी, कूर्मदास ला दिलासा
पंढरपूर : ईगल आय मीडिया
सोलापूर जिल्ह्यातील 6 साखर कारखान्यास राज्य शासनाने सुमारे 120 कोटी रुपयांची शासनाने कर्ज हमी दिलेली आहे. त्यामुळे या कारखान्याच्या हंगाम सुरू होण्यास मदत होणार आहे.
आज ( दि.9 रोजी ) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील 32 साखर कारखान्यांना 516 कोटींच्या कर्जास शासनाने हमी दिली आहे.
यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील श्री विठ्ठल सहकारी 31 कोटी, भीमा सहकारी 20 कोटी, दामाजी सहकारी 10.58 कोटी, कूर्मदास 5 कोटी, सहकार शिरोमणी 14.52 कोटी, सहकार महर्षी 33.24 कोटी रुपये या 6 साखर कारखान्यांना सुमारे 120कोटी रुपयाची हमी शासनाने दिली आहे.
त्यामुळे अडचणीत असलेल्या भीमा, सहकार शिरोमणी, विठ्ठल या कारखान्यास मोठी मदत होणार आहे. तसेच भीमा आणि सहकार शिरोमणी या कारखान्याच्या गाळप हंगामाचा मार्गही मोकळा झाला आहे.