उजनीचे 16 दरवाजे उघडले : भीमेला 20 हजार क्यूसेक्सचा विसर्ग

सावधान, पूरस्थिती अटळ , भीमा दुथडी वाहणार !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढल्याने भीमा नदीला उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग 20 हजार क्यूसेक्स इतका वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे भीमा नदीला पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे.

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे शनिवारी सकाळी 4 धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे बंडगार्डन येथे 13 हजार क्यूसेक्स पेक्षा जास्त विसर्ग उजनीत येत आहे. दौंड येथे हाच विसर्ग 14 हजार 962 क्यूसेक्स आहे. तसेच घोड धरणातून सुद्धा पाणी सोडण्यात आले आहे आहे. सध्या उजनी धरण 110 टक्के भरले असल्याने उजनी धरणातून शनिवारी सायंकाळी 15 हजार क्यूसेक्स तर शनिवारी रात्री 20 हजार क्यूसेक्स विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. तसेच कालवा, बोगदा, वीजनिर्मिती यासाठीही पाणी सोडले जात आहे.


मात्र पुणे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे 100 टक्के भरली आहेत त्यामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी भीमा नदीला सोडले जाणार आहे. पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आता उजनीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत असून शनीवारी रात्री 16 दरवाजे 0.35 फूट उचलून 20 हजार क्यूसेक्स केला आहे.
दरम्यान वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग मात्र शनिवारी सकाळपासून बंद केला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!