पंढरपूर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण 420
पंढरपूर : ईगल आय मीडिया
सोमवारी शहर व ग्रामीण 61 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यासह तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 420 एवढी झाली आहे.
शहरात नवीन 59 नेवतगाव 1 करोळे 1 असे 2 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सोमवारी एकूण 182 अहवाल आले, त्यापैकी 121 निगेटिव्ह तर 61 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिलेल्या माहितीनुसार पॉझिटिव्हमध्ये शहरात नवीन रुग्ण हनुमान मैदान, भजनदास चौक, सनागर गल्ली, विप्र दत्त घाट, इसबावी, गवंडी गल्ली, घोंगडे गल्ली, भोसले चौक, महाद्वार अनिलनगर, तानाजी चौक, संत पेठ, कोळी गल्ली, सावता माळी मठ, संत पेठ, रोहिदास चौक, गोविंदपुरा, गांधी रोड, जुनी पेठ, विजापूर गल्ली, लक्ष्मी नारायण चौक, सिद्धिविनायक सोसायटी, सावतामाळी नका, रामबाग रोड, जुना सोलापूर नाका, कडबे गल्ली, बडवे चर,अशा परिसरात रुग्ण सापडले आहेत.
पंढरपूर शहर व तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 420 एवढी झाली आहे .