जिल्ह्यातील बचतगटांना 166 कोटीचे कर्ज वाटप होणार : सिईओ स्वामी

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण चा शुभारंभ

सोलापूर : ईगल आय मीडिया

बचत गटाच्या महिला ज्या जिद्दीने काम करतात. ते कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील बचतगटांना ३७ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. १०० कोटीचे कर्ज वाटप करणेत येणार आहे. बचतगटांनी ग्रामीण सुविधा केंद्र निर्माण करा. १६६ कोटी रूपये कर्ज बचतगटांना वाटप करायचे आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मध्ये सहभागी व्हा असे आवाहन
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. सांगोला पंचायत समिती च्या वतीने उमेद अंतर्गत सुविधा केंद्राचा शुभारंभ सांगोला येथे करणेत आला. सांगोला शहरातील बचतभवन येथे आयोजित कार्यक्रमात त्ते बोलत होते.

या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, प्रकल्प संचालक स्मिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, सभापती राणी कोळवले, उप सभापती जगताप, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उमेद अभियान व्यवस्थापक गंगा मडवळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर चंचला पाटील व स्मिता पाटील सभापती राणिताई कोळवले, उपसभापती नारायण जगताप, जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, जिल्हा अभियान व्यवस्थापक मीनाक्षी मंडवळी व जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे व राहुल जाधव तसेच प्रभागातील महिला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम आठवडी बाजार चे उद्घाटन प्रभाग संघ कार्यालयाचे उद्घाटन व nretp अंतर्गत स्थापन केलेल्या तालुका उद्योग विकास केंद्र (osf)कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी ऑनलाइनच्या माध्यमातून राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष मुंबई चे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री हेमंत वसेकर साहेब उपस्थित होते यावेळी सक्षम महिला प्रभाग संघ कडलास ची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमामध्ये बोलताना माननीय दिलीप स्वामी यांनी प्रभाग संघाच्या कामाचे कौतुक करताना पुढील कामकाज शुभेच्छा दिल्या.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वार्षिक अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच राज्य व्यवस्थापन कक्ष मुंबई चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी चार गटांना एकूण चार लाख ऐंशी हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग संघाच्या अध्यक्षा उषाताई येलपले सचिव राजक्का काटे, कोषाध्यक्ष मैनाताई केदार, प्रभाग संघ व्यवस्थापक मेघाताई ऐवळे, लीपिका सुरेखा काटे व तालुका स्तरावरील कर्मचारी तालुका अभियान व्यवस्थापक कुणाल पाटील, bm ibcb दीपमाला सोमाणे, bc fl अमोल सावंत, bm mis महंतवीर घाडगे, bc of सुधीर पिसे, महेश साठे , किशोर बिडे, अभिजीत महादेवकर, राहुल माने , सचिन भोसले, दिपक गाडे, अजित वाघमारे, पंचरत्न राजपाल यांनी परिश्रम घेतले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय जिल्हा अभियान व्यवस्थापक मीनाक्षी मंडळी यांनी केले. व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका अभियान व्यवस्थापक कुणाल पाटील यांनी केले.

Leave a Reply

error: Content is protected !!