सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चाची औपचारिकता पूर्ण

पोलिसांनी आणलेल्या निर्बंधामुळे सोलापुरात पोहोचण्यासाठी नेत्यांची झाली दमछाक !

सोलापूर : ईगल आय मीडिया

यापूर्वी मराठा समाजाने काढलेले मोर्चे सारथी साठी नव्हते, अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी नव्हते, वस्तीगृहासाठी नव्हते. तर आरक्षणसाठी होते. राज्य आणि केंद्र सरकारने एकमेकांकडे बोट दाखवू नये, आरक्षण द्यावे अशी मागणी भाजपचे नेते आणि मराठा आक्रोश मोर्चाचे संयोजक नरेंद्र पाटील यांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूरात मराठा आक्रोश मोर्चा संपन्न झाला.या मोर्चाला परवानगी नसताना हा मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे आजच्या मोर्चाची गर्दी फक्त काही हजारांत होती. गर्दी अभावी पोलिसांशी झालेल्या नेत्यांच्या संघर्षामुळे मोर्चाची मोठी चर्चा झाली.

vdo : सोलापुरात झालेला आक्रोश मोर्चा पहा

सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी अडथळे आणल्याने दुपारी 1 वाजता छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातच या मोर्चाची सांगता झाली. तेथून मोटारीने नेते मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. त्याठिकाणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले.

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धयेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे ,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, त्याचबरोबर भाजपच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक भाजपचे दोन खासदार, आठ आमदार, नगरसेवक, अनेक जिल्हा परिषद सदस्य, ३ माजी आमदार असे भाजपचे नेते मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.

सकल मराठा समजाच्यावतीने यापूर्वी काढण्यात आलेल्या भव्य मोर्चावेळी राजकीय पुढाऱ्यांना सर्वात शेवटी ठेवण्यात आलं होतं. शिवाय सर्व समाज एक समांतर होता. ती स्थिती आजच्या मोर्चात नव्हती. त्यामुळे हा मोर्चा मराठा समाजाचा की भाजपचा ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर निघालेला हा मोर्चा मराठा समाजाचा कमी अन् भाजपचा जास्त असाच पहायला मिळाला.

Leave a Reply

error: Content is protected !!