दगडफेकीत सुशीलकुमार शिंदे यांचे पोस्टर फाटले

सोलापूर काँग्रेस भवन येथील बोर्डवर शाई फेकली

सोलापूर : ईगल आय मीडिया

सोलापुरातील काँग्रेस भवन समोर असणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या बोर्डवर शाई फेकुन दगडफेक करण्यात आल्याची घटना घडलीय. यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या फोटो वर दगड फेकल्याने तो फोटो फाटला आहे. तसेच अन्य नेत्यांचे फोटो असणाऱ्या nsui च्या बोर्डावर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली आहे. यामुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे. हे कृत्य कोणी व का केले हे अद्याप समोर आले नसले तरी शहर अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडला असावा असेही बोलले जात आहे.

सोलापूर शहर जिल्ह्यात काँग्रेसचे कामकाज जोमाने सुरू असून हे विरोधकांना बघवत नाही. या कृत्याचा मी निषेध करतो. निंदकाचे घर शेजारी असावे. हे कृत्य ज्याने केले ते मोटारसायकलवरून दोघे आल्याचे पाहिले आहे, त्यातील एकजण भगवा शर्ट घातलेला होता. एक प्रकारे विरोधकांनी ही घटना केली आहे.

प्रकाश वाले , काँग्रेस शहराध्यक्ष, सोलापूर

सोलापूर येथे काँग्रेस भवन समोर सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे आणि एन एस यु आय चे बोर्ड लावण्यात आले आहेत. या बोर्ड वर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी , राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांचे फोटो आहेत. या फोटोंवर शाई फेकून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची निवड झाली.मात्र शहराध्यक्ष पदाच्या निवडीवरून वाद सुरू आहे. त्या वादातून च हा प्रकार घडल्याची शहरात चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!