तुमच्या सूचनांचा शंभर टक्के विचार करू : शंभरकर यांचे आश्वासन

मुख्यमंत्र्यांचा निरोप आणि आश्वासन घेऊन जिल्हाधिकारी तातडीने पंढरीत

फोटो
जिल्हाधिकाऱ्यांनी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली 

प्रतिनिधी : पंढरपूर


पंढरपूर विकास आराखड्यातील प्रस्तावित कॅरिडॉर ची अंमलबजावणी करताना स्थानिक आणि बाधित नागरीक, व्यापाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय काहीही होणार नाही. तुमच्या सर्व सूचनांचा 100 टक्के विचार करूनच पुढील निर्णय घेतले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तीर्थक्षेत्र बचाव समितीसोबत झालेल्या बैठकीत दिले आहे.

शुक्रवारी पंढरीत कॅरिडॉर बाधित व्यापारी आणि स्थानिक नागरिक यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी समितीने राज्य सरकार विश्वासघात करीत असल्याचा आरोप केला आणि कॅरिडॉर रद्द करा नाहीतर पंढरीचा समावेश करर्नाटकात करा, आषाढी एकादशीला कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना बोलावू असा ईशारा दिला होता.

त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना तातडीने पंढरीत जाऊन तीर्थक्षेत्र बचाव समितीसोबत बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा निरोप दिला होता. त्यानुसार तातडीने जिल्हाधिकारी शुक्रवारी सायंकाळी उशिरा पंढरीत आले आणि शासकीय विश्रामगृह येथे समिती सोबत बैठक घेतली. 


याावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर  यांनी मुख्यमंत्र्यांचा निरोप तर सांगितलाच शिवाय स्थानिक नागरिक जो आराखडा देतील त्याचा शंभर टक्के विचार करून, सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय होतील, तोवर सध्या सुरू असलेली कामे थांबवली जातील अशीही ग्वाही जिल्हाधिकारी यांनी दिली. 

Leave a Reply

error: Content is protected !!