उच्च न्यायालयाने दिला आदेश : शनिवारी अधिकृत घोषणा अपेक्षित
टीम : ईगल आय मीडिया
16 फेब्रुवारी पर्यंत सर्व सरपंच निवडीला उच्च न्यायालयाची स्थगिती। टीम : ईगल आय मीडिया। सरपंच पदाच्या आरक्षण सोडत प्रक्रिये विरोधात दाखल याचिकांवर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि विनय जोशी यांनी ने 16 फेब्रुवारी पर्यंत स्थगिती दिली आहे. यामुळे पुणे, सांगली, सातारा कोल्हापूर, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यातील सरपंच निवडीला स्थगिती दिली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी शंभरकर हे आज ,( शनिवारी ) घोषणा करतील असे समजते. मात्र सरपंच निवडीवरून अगोदरच वातावरण तापलेल असताना न्यायालयीन पेचा मुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि ग्रामपंचायत नूतन सद्स्य ही पेचात पडले आहेत.
राज्यातील सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून गावोगावी या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरू आहे. जानेवारी च्या अंतिम आठवड्यात सरपंच आरक्षण सोडत काढली आहे मात्र पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यातील 31 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडतीवर हरकत घेऊन इच्छुक उमेदवार उच्च न्यायालयात गेले आहेत.
सरपंच आरक्षण सोडतीवर हरकत घेण्यात आली आहे. त्यावर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने 8 ते 11 फेब्रुवारी या दरम्यान होणाऱ्या सरपंच निवडी स्थगित कराव्यात असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तथापि 30 दिवसांत सरपंच, उपसरपंच निवडी होणे आवश्यक असल्याने 16 फेब्रुवारी पूर्वी या गावच्या निवडी घ्याव्यात, तोपर्यंत 8 ते 11 दरम्यान होणाऱ्या सरपंच निवडीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता जिल्हाधिकाऱयांचा सुचनांकडे लक्ष लागले आहे.