काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी धवलसिंह मोहिते पाटील यांची नियुक्ती

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू असलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदा ची अखेर खांदे पालट करण्यात आली आहे. प्रकाश पाटील ( पाणीवकर ) यांच्या जागी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी सी वेणूगोपाल यांनी आज राज्यातील विविध पदांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्याचबरोबर पक्षाचे प्रदेश प्रवक्ते, शिस्तपलन समिती,अशा विविध समिती च्या निवडी आज जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शिफारशीनुसार या पदांना मंजुरी देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून पाणीवकर प्रकाश पाटील यांच्याकडे या पदाची धुरा होती. त्यांनी प्रतिकूल काळात पदभार स्वीकारून पक्षाचे कामकाज नेटाने चालवले होते. मात्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर आणि त्यामध्ये काँग्रेस पक्ष सामील झाल्यानंतर पक्षात जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू झाली.

यामध्ये माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी जिप सदस्य सुरेश हसापुरे यांची नावे आघाडीवर होती. मात्र आज दिल्लीतून जाहीर करण्यात आलेल्या जिल्हाध्यक्ष पदांच्या यादीत धवलसिंह मोहिते पाटील यांचे नाव आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचबरोबर सांगली च्या जिल्हाध्यक्षपदी जत चे आमदार विक्रमसिंह सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील माजी आम रामहरी रूनवर यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!