सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 12 हजार 500 पार


384 पॉझिटिव्ह : 11 जणांचा मृत्यू

पंढरपूर : ईगल आय मीडिया

3 सप्टेंबर रोजी सोलापूर ग्रामीण मध्ये आज 2595 अहवाल प्राप्त झाले. यात 384 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 11 जणांचा मृत्यु झाला असून आज 135 जण कोरोना मुक्त झाले.
ग्रामीण मधे आजवर एकूण दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या तब्बल
12509 झाली आहे.आणि जिल्ह्यात आजवर 360 जण मृत्यू पावले आहेत.

3 सप्टेंबर रोजीच्या सोलापूर जिल्ह्यातील कोविड तपासणी अहवालात एकूण 384 कोरोना बाधित सापडले आहेत. आणि सध्या 3348 जणांवर उपचार सुरू आहेत तर 8801 एक जण कोरोना मुक्त झाले.

सोलापूर शहरात आज 1041 अहवाल प्राप्त झाले यात 58 जण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले आहेत.
3 जणांची मृत म्हणून नोंद आहे तर शहरात आज 147 जण कोरोना मुक्त झाले.
आजवर सोलापूर शहरात 6815 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले 423 जणांचा मृत्यू झाला .सध्या 669 जणांवर उपचार सुरू आहेत तर 5723 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
पंढरपूर तालुका सर्वात आघाडीवर

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पंढरपूर तालुक्यात दिसून येत आहे. 3 सप्टेंबर पर्यंत पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक 2 हजार 783 एवढे रुग्ण सापडले आहेत. मात्र तुलनेत मृत्यू दर कमी असून 57 लोकांचे कोरोना विरोधी लढयात प्राण गेले आहेत. जिल्ह्यात बार्शी तालुक्यात सर्वाधिक 95 रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!