सोलापूर जिल्ह्यातील 687 गावे कोरोनामुक्त

सोलापूर शहरातील निर्बंध हटवले : पंढरीत मात्र निर्बंध वाढवले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाचे रुग्ण वेगाने कमी होत आहेत. जिल्ह्यातील 1243 पैकी तब्बल 687 गावे कोरोनामुक्त आहेत. 10 पेक्षा कमी रुग्ण असलेली 569 गावे आहेत. तर दुसऱ्या बाजूला पंढरपूर सह 5 तालुक्यात जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहेत. दरम्यान, उद्यापासून सोलापूर शहरातील निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत आणि सर्व दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत असे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून जिल्ह्यातील 1243 पैकी 687 गावामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. त्यामुळे सुमारे 55 टक्के जिल्हा कोरोनामुक्त झालेला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण असलेल्यवां मध्ये रुग्णांची संख्याही कमी होत आहे. 10 पेक्षा अधिक रुग्ण असलेली जिल्ह्यात फक्त 118 गावे आहेत. तर 10 पेक्षा कमी रुग्ण 560 गावांमध्ये आहेत.


चिंताजनक बाब म्हणजे दहापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांमध्ये सर्वाधिक गावे ही पंढरपूर तालुक्यातील असून तालुक्यातील 100 पैकी तब्बल 36 गावांमध्ये आजही 10 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. त्यामुळेच पंढरपूर तालुक्यात 10 दिवसांसाठी कोरोना नियम कडक केले आहेत.
ज्या गावांमध्ये दहापेक्षा अधिक रुग्ण आहेत त्या गावातील सर्व कुटुंबाची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

सोलापूर शहरातील निर्बंध शिथिल !
सोलापुरात 15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिलेथेबाबतचा पालिका आयुक्तांचा आदेश निघाला आहे. आज ( शनिवार ) सर्व दुकाने बंद राहतील, मात्र रविवार पासून सकाळी सात ते रात्री दहापर्यंत सर्व दुकाने खुली राहतील.

सोलापूर शहरातील धार्मिक स्थळे, सिनेमागृहे बंदच राहणार आहेत. तर हॉटेल, दुकाने, मॉल्स रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!