सोलापूर : ईगल आय मीडिया
गेल्या दीड महिन्यापासून कोरोना रुग्ण संख्येने आणि मृत्यूमुळे हवालदिल झालेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी आज काही प्रमाणात दिलासादायक बातमी आहे.
आजच्या अहवालात केवळ 406 एवढेच पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आले आहेत. मागील काही आठवड्यात ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे.विशेषतः, पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने जाहीर केलेली आजच्या अहवालात संपूर्ण जिल्ह्यात केवळ 406 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 20 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. माळशिरस तालुक्यात सर्वाधिक 92 तर उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या दोन्ही तालुक्यात सर्वात कमी प्रत्येकी 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पंढरपूर शहर आणि ग्रामीण दोन्ही 54 अहवाल तर मंगळवेढा तालुक्यातील 35 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज झालेल्या 20 मृत्युपैकी 6 तालुक्यातील 20 जनांचा समावेश आहे तर 5 तालुक्यात आज एकही मृत्यू नाही.
पंढरपूर, मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येकी 4 जनांचा तर बार्शी आणि सांगोला प्रत्येकी 3माळशिरस तालुक्यातील 2 जनांचा आज मृत्यू झालेला आहे.