1028 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निघणार सोडत

पंढरपूर : ईगल आय मीडिया
सोलापूर जिल्ह्यातील 1028 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 16 डिसेंम्बर रोजी काढण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कार्यक्रम जाहीर केला आहे. आरक्षण सोडतीकडे संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे लक्ष लागून राहिले होते.
लवकरच जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. ऑगस्ट आणि नोव्हेंबर मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडनुका कोरोनामुळे प्रलंबित राहिल्या आहेत, या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षणेही निश्चित झालेली नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले होते.
मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व 1028 ग्रामपंचायतीच्या 2020 ते 2025 या कालावधीसाठी आरक्षण सोडत 16 डिसेंबर रोजी त्या त्या तालुक्यातील मुख्य ठिकाणी सकाळी 11 वाजता लोकप्रतिनिधी आणि सर्व सामान्य नागरिकांच्या उपस्थितीत काढण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी कोरोना विषयक नियमांचेही पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.