सोलापूरच्या बचतगटांनी बनवलेल्या हस्तकला वस्तूस ब्राझील कडून मागणी : सिईओ स्वामी

बचतगटांसाठी तीन योजनांचा कृतीसंगम


सोलापूर : ईगल आय मीडिया

सोलापूर मधील बचतगटांची हस्तकलेच्या वस्तूची ब्राझील देशात निर्यात केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बचतगटांसाठी तीन योजनांचा कृतीसंगम करा अशा सुचना सिईओ दिलीप स्वामी यांनी आज दिल्या. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज उमेद मधील जिल्हा व तालुका स्तरावरील तालुका अभियान व्यवस्थापक व कर्मचारी यांची आढावा बैठक घेणेत आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना सिईओ दिलीप स्वामी बोलत होते.

या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक संतोष धोत्रे, उमेदच्या अभियान व्यवस्थापिका मिनाक्षी मडवळी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, ग्रामीण विकास प्रकल्प विभागाचे सहा प्रकल्प अधिकारी कुलकर्णी, प्रमुख उपस्थित होते.


सोलापूर मधील बचतगटांची हस्तकलेच्या वस्तूची ब्राझील कडून मागणी – सिईओ स्वामी

सोलापूर जिल्हातील बचत गटातील महिलांची स्वावलंबी करणेसाठी आपली यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी करा. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यांतील मानेगाव येथील स्वयंकृता स्वयंसहाय्यता बचतगटांने तयार केलेल्या टेरीकोटा आर्ट ( पारंपरिक हस्त कलेच्या) वस्तूंचे उत्पादन केले आहे. या मधील १२ नग ब्राझील येथे पाठविणेत आले आहेत. पेण येथे या बचतगटाने पारंपरिक हस्त कलेचे शिक्षण घेतले आहे. ब्राझीलने या बचतगटाचे पत्र लिहून आभार व्यक्त केले असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.


बचतगटांनी खेळते भाडंवलाचा उपयोग ग्रामीण सुविधा केंद्रासाठी करावा. यामधून घरकुल, शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन साठी करावयाच्या शौषखड्डे साठी चे साहित्य या ग्रामीण सुविधा केंद्रातून दिल्यास बचतगटांना लाभ होईल. मागणी आधारित पुरवठा केल्यास बचतगटांना संधी आहे. या ग्रामीण सुविधा केंद्रातील साहित्य घेणेत यावे. यामुळे शासकीय योजनांना गती मिळेल. गरीब महिलांना बचतगटांचा आधार आहे. त्यांना समजून घेण्यासाठी आपली निर्मिती आहे. हे विसरू नका. गटांचे बॅंक लिंकेज करा. सिईओ स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा राज्यात टाॅप थ्री मध्ये राहण्यासाठी दिलेली उदिष्ट पुर्ण करा. खेळते भांडवल उपलब्ध करणेसाठी प्रशासकीय तयारी ठेवा. राज्य स्तरावरून निधी उपलब्ध झालेनंतर त्या नुसार नियोजन करा. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ मध्ये सोलापूर जिल्हा प्रथम राहणेसाठी अॅप डाऊन लोड करून सर्वेक्षणात प्रतिसाद द्या, ग्रामीण सुविधा केंद्र सुरू करा असे आवाहन अति ceo संतोष धोत्रे यांनी केले.

सोलापूर जिल्ह्यातील महिलांकडे जाॅबकार्ड आहे. शौषखड्डे रोहयो मधून घेता येतील. तशी मागणी करा. सांडपाणी व्यवस्थापनात बचतगटांना संधी द्या. ग्रामीण सुविधा केंद्र बरोबरच वैयक्तीक शौचालयासाठी आधारकार्ड देऊन नाव नोंदणी करा. असे आवाहन केले. माझी वसुंधरा मध्ये असलेल्सा १७ ग्रामपंचायती मध्ये ग्रामीण सुविधा केंद्र सुरू करा , बचतगटांच्या योजनांचा कृतीसंगम करणेचे सुचना सचिन जाधव यांनी दिल्या.

Leave a Reply

error: Content is protected !!