श्रीमती तेजस्वी सातपुते यांची इनिंग सुरू
सोलापूर : ईगल आय मीडिया
सोलापूर जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षक आय पी एस श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी आज ( दि. 9 ).आपला पदभार स्वीकारला आहे. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक ( ग्रामीण ) अतुल झेंडे यांनी त्यांचे स्वागत केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली झाल्यानंतर सातारा येथे जिल्हा पोलिस अधीक्षक असलेल्या श्रीमती तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे. श्रीमती सातपुते या पहिल्याच महिला जिल्हा पोलिस अधीक्षक आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. यापूर्वी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून मनीषा दुबुले यांनी चांगले काम केले होते.
या पार्श्वभूमीवर श्रीमती सातपुते यांनी आज जिल्हा।पोलिस मुख्यालयात येऊन पदभार स्वीकारला आहे. यावेळी अतिरिक्त जि पो अधीक्षक अतुल झेंडे यांनी त्यांचे स्वागत केले.