मटका, जुगार अड्ड्यावर धाड : पळून जाताना पडल्याने एकजण ठार

सोलापुरात भाजप नगरसेवक, 1 पोलीस कर्मचाऱ्यासह 40 जनाविरोधात गुन्हा दाखल

सोलापूर : ईगल आय मीडिया

सोमवार ( दि, 24 रोजी) सोलापूर येथील कुंची कोरवी गल्ली येथील मटका बुक्की आणि जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचे पथक कारवाई साठी गेले असता, पळून जाण्याच्या प्रयत्नात एक जण पहिल्या मजल्यावरून खाली पडला आणि मयत झाला. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक सुनील कामाठी यांचे सह 1 पोलीस कर्मचारी आनि इतर 40 जणांच्या विरोधात जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटलं आहे की, सोमवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप हे कुंची कोरवी गल्लीतील मातृ छाया बिल्डिंगमध्ये मोबाईल वर मटका घेत असल्याची माहिती मिळाल्याने कारवाई साठी गेले होते.

पोलीस आल्याचे समजताच त्या ठिकाणच्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पहिल्या मजल्याच्या हॉलमध्ये काही लोक जुगार खेळत होते. त्यातील काही जणांनी मागील दरवाजातून उडी मारून धूम ठोकली. यावेळी
परवेझ नुरोद्दीन इनामदार ( वय42 ) हा खाली पडला. त्याला जखमी अवस्थेत सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी मयत असल्याचे सांगितले. जेल रोड पोलिसात याची नोंद आकस्मिक मयत अशी करण्यात आली आहे.

या वेळी घटनास्थळी पोलिसांनी 22 लोकांना ताब्यात घेतले. तर 16 ते 18 लोक पळून गेले. या ठिकाणी पोलिसांना हिशोबाच्या 200 वह्या, मोबाईल, मोटारसायकली जप्त केल्या आहेत. तर नगरसेवज सुनील कामाठी, पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी यांच्यासह 40 जनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!