सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती

सोलापूर जिल्ह्यात प्रथमच महिला पोलीस अधीक्षक नियुक्त

सोलापूर : ईगल आय मीडिया

गेल्या 15 दिवस रिक्त असलेल्या सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक पदी आय. पी. एस. श्रीमती तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती झाली आहे. सातारा येथे एस.पी.म्हणून कार्यरत असलेल्या तेजस्वी सातपुते या डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून परिचित आहेत.

यासंदर्भात आज अधिकृत आदेश निघाला असून श्रीमती सातपुते शुक्रवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत. सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी श्रीमती सातपुते यांची नियुक्ती झाली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून सोलापूर जिल्ह्यात प्रथमच महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!